येस न्युज नेटवर्क : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून रिझर्व पोलिस हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले एकूण पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले. लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास 300 फूट खोल खाली कोसळल्याचा प्राथमिक आनंदच आहे. या घटनेबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही माहिती मिळतेय का याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.