केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धा वालकर (वय २७ ) हत्येप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्ह आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणात ज्याने तिची हत्या केली त्याला कमीत कमी कालावधी कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष हे प्रयत्न करतील, असं अमित शहा म्हणाले. टाइम्स ग्रुपने आयोजित केलेल्या ‘टाइम्स नाउ समीट’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रद्धा वालकर प्रकरणावर आपले लक्ष आहे. ज्याने कोणी श्रद्धाची हत्या केली आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळेल, अशी ग्वाही मी देशाच्या जनतेला देतो, असं अमित शहा म्हणाले. श्रद्धा वालकर प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिचा मित्र आफताब पुनावाला याला ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची पोलीस कोठडी पूर्ण होईल, असं शहा यांनी सांगितलं. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा कुठलाही अभाव नाही, नाही असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.