सोलापूर : सोलापुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.
मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती.
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हटले आहे?
पोलिसांनी आयोजकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “आपल्या न्युज चॅनलच्या वतीने 19 ऑक्टोबर रोजी वृंदावन गार्डन, एन आय जामगुंडी फार्म हाऊस, आसरा चौक, रेल्वे ब्रिज शेजारी, जुळे सोलापुर याठिकाणी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत डिस्को दांडीया आयोजित केले आहे. या कार्यक्रमास गौतमी पाटील यांची उपस्थिती असणार आहे व त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. तर, सदर कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे आपला अर्ज प्राप्त झाला असुन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सदरचे पत्र स्थानिक पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे.