स्ट्रीमलाइन अकादमी – किड्स फिटनेस क्लब, सोलापूर या संस्थेचे प्रशिक्षकत्व व मार्गदर्शन लाभलेल्या चार खेळाडूंची निवड नुकत्याच पार पडलेल्या एशियन स्पोट्र्स एरोबिक्स चॅम्पियनशिप २०२५, दुबई, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेमध्ये भारतीय संघात सोलापूरच्या तिन्ही खेळाडूंनी एकूण ६ पदकांची कमाई केली असून यामध्ये ४ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांचा समावेश आहे.
सोलापूरच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत पदकांची नोंद झाली असून ही बाब संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे. डॉ. मोहिनी मोरे ताकते (स्थापिका आणि संचालिका – स्ट्रीमलाइन अकादमी किड्स फिटनेस क्लब) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरा गनेर, हीर गाला आणि अनुश्का चव्हाण या खेळाडूनी आपली गुणवत्ता सिद्ध करत जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे.
पदकविजेते खेळाडू :
स्वरा गनेर २ रूप्य
हीर गाला – २ सुवर्ण
अनुश्का चव्हाण – २ सुवर्ण
या स्पर्धेत एकूण ६ देशांमधील (कतार, कुवेत, बांगलादेश, UAE, नेपाळ, भारत) १२० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विविध वयोगटातील क्रीडाप्रकारांमध्ये अतिशय कठीण स्पर्धेतून ही यशस्वी घोडदौड साधली आहे. या यशात विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीसोबतच डॉ. मोहिनी मोरे ताकते यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि वैयक्तिक लक्ष याचा मोलाचा वाटा आहे.
खेळाडूंच्या या कामगिरीची दखल समाजातील विविध विविध क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवर मान्यवर घेत आहेत. सोलापूर जिल्हा पोलिस आयुक्त मा. राज कुमार यांच्या याच्या हस्ते व मनोरमाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या खेळाडूंचा सत्कार मंगळवार २४ जून रोजी सोलापूर ऑफिसर्स क्लब येथे संपन्न होणार आहे.
या यशामुळे सोलापूरचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल झाले असून स्ट्रीमलाइन अकादमी ने मुला-मुलीच्या फिटनेस आणि स्पोट्र्ट्स क्षेत्रातील भूमिका किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.