मास्क वापरा व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा पोलिसांचे आवाहन
सोलापूर : कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात बुधवारी २८ एप्रिल रोजी मास्क न लावलेल्या ३७६ व्यक्तींकडून १, ८८,००० रुपये दंड वसूल केला . त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदा मोडल्यामुळे २६५ व्यक्तींविरुद्ध कारवाई करीत ५५,८०० रुपये दंड वसूल केला . सहा अस्थापना विरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याने १६,००० रुपये दंड वसूल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नाकाबंदी कारवाईदरम्यान एकूण १९५७ वाहनांची तपासणी करण्यात आली. संचारबंदी काळातील निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे.