सोलापूर – संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी P.M. National Apprenticeship Mela चे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहे. या मेळाव्यात आय.टी.आय उत्तीर्ण, १२ वी उत्तीर्ण, डिप्लोमा व पदवीधर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतात. सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर येथील एम. एम. बिडकर यांनी केले आहे.

