येस न्युज मराठी नेटवर्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्याने लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती. करोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी म्हणाले आहेत.
मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एम्स रुग्णालयात आज करोना लसीचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा”.