सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एक पद एक वृक्ष हे अभियान सुरू केले आहे मात्र त्यांनी या अभियानामध्ये स्वतःच्या शासकीय बंगल्याभोवती एक नव्हे तर एकशे पाच झाडे लावून त्या झाडांची स्वतः जबाबदारी घेतली आहे. लिटिल फ्लावर शाळेच्या समोर असलेल्या विकास गंगा या जिल्हा परिषद सीईओ यांच्या शासकीय बंगल्यापासून जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्यापर्यंत दुतर्फा शनिवारी सकाळी झाडे लावण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी करुणा स्वामी, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार उद्योजक प्रल्हाद काशीद, सकाळचे संपादक अभय दिवाणजी महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आणि शहरात वृक्षारोपण ही चळवळ बनली पाहिजे अशी भावना यावेळी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली