सोलापूर : रोटरी क्लबच्या वतीने आज एमआयडीसी येथे महापौर श्रीकांचना यन्नम व उपआयुक्त धनंराज पांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रोटरी अध्यक्ष श्रीनिवास ईट्टम, सचिव चार्वाक बुर्गूल, व्यंकटेश चन्ना, सत्यनारायण गुर्रम, अंबादास गड्डम, रमेश कमटम, नरसिंग कनकी, सिध्देश्वर गड्डम, बुचय्या गुंडेली, सन्नी दौलताबाद,अशोक मानवद, विठ्ठल वंगा,टिडीफचे सचिव संजय मडूर, बिटला ईराबत्ती.सर्व रोटरी कल्ब आँफ सोलापूर एमआयडीसीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी चे अध्यक्ष श्रीनिवास ईटम या परिसरात २५० रोप लावण्यात आले असून ट्री गार्डची सोय करण्यात आली आहे अशी माहिती दिली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी रोटरी क्लबला शुभेच्छा दिल्या तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम चागल्या पध्दतीने राबवत आहात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.