Plantation of trees in Solapur University on the occasion of World Environment Day
कुलगुरूंसह अधिकारी, विद्यार्थ्यांनी लावली 101 रोपे !
सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्य अतिथी गृह परिसर आणि विद्यापीठ कँपसमध्ये 101 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि भूशास्त्र संकुलाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शाह, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, इनक्यूबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. धवल कुलकर्णी, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी या सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
यावेळी भूशास्त्र संकुलातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियांत्रिकी विभागातील विनोद बंडगर, प्रशांत भोसले आणि माळी कर्मचाऱ्यांचे वृक्षारोपणासाठी सहाय्य लाभले. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी ई-व्हेईकल स्वतः चालवून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.