सोलापुर – टिळक चौक येथील शिवसृष्टी प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त मिरवणूक खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हरित वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने रोप वाटप करण्यात आले. आंबा, सीताफळ, जांभूळ, करंज, बहावा या देशी प्रजातीच्या ५० रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले. यासोबतच फाऊंडेशनच्या वतीने शिवाजी महाराजांचे विचार सांगणारे दोन सहा फुटी बॅनर ही लावण्यात आले होते. असे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आणि संस्थेचा सन्मान केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमोल केकडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन व मनःपूर्वक आभार. यावेळी संस्थेचे सौरभ पोरे, सागर संभारम, प्रतीक भडकुंबे, राजेश दोरणाल आणि अमित बनसोडे हे सदस्य उपस्थित होते.