मुंबई : महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. एबीपी माझाशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. सोबतच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा मांडला जाईल, असंही सांगितलं.
पोलीस भरती
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दलात साडेबारा हजार जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया राबवली. पोलीस भरती करताना कोणत्या समाजावर अन्याय न करता भरती प्रक्रिया राबवू. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेपाच हजार पदांची भरती करतोय.