सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्व तयारी व नियोजन बैठक आज झाली. सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान 1 लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे. समाजाच्या सर्व थरांतील,सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत.ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील 15 हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारी करीता शनिवारी रे नगर कुंभारी येथे नियोजनासाठी मा.जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक ग्रामीण,म्हाडा संबधित सर्व अधिकारी, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर,रे नगर चे चेअमन नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे,माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समावेत शासकीय बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा,नकाशा,व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टर द्वारा देण्यात आली.
यानंतर जिल्हाधिकारी कुमार विश्वास व पोलीस अधीक्षक गिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रे नगर परिसराची पाहणी व सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले. तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमन साठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे , हेलिपॅड कोठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारत घेतली आहेत.
यावेळी अव्वर अधीक्षक यावलकर उपअधीक्षक यामवार, अमोल भारती,पोलीस निरीक्षक एल. निंबाळकर, पोलीस निरीक्षक सनगले,उप पोलीस निरीक्षक उस्मान शेख,जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील,चे उप अभियंता धनशेट्टी,म्हाडा चे उप अभियंता मिलिंद अटकळे, जिल्हा परिषद चे उप अभियंता बिडला,रमेश राठोड,गजेंद्र दंडी, ॲड.अनिल वासम आदी उपस्थित होते.