­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वधारल्या?

by Yes News Marathi
April 10, 2023
in मुख्य बातमी
0
देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वधारल्या?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर शुक्रवार 7 एप्रिल रोजी किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.
डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 0.25 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 80.89 डॉलरवर व्यापार करत आहे. तर, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून किंमत 85.32 डॉलर प्रति बॅरल झाली. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत तर काही शहरांमध्ये दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील कोणत्या शहरात किती दर?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 15 पैशांनी वाढून 96.62 रुपये आणि डिझेल 89.81 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. नोएडामध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. येथे पेट्रोल 96.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लीटर आहे. तर गुरुग्राममध्ये पेट्रोल 18 पैसे प्रति लिटर 96.66 रुपये आणि डिझेल 89.54 रुपये प्रति लिटर असून चंदीगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. तर पाटणामध्ये पेट्रोलचा दर 18 पैशांनी स्वस्त झाला असून 107.24 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 94.04 रुपये प्रति लिटर इतका आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 32 पैशांनी स्वस्त झाले असून सध्या 108.16 रुपयांना मिळतंय. त्याचवेळी, डिझेलची किंमत 29 पैशांनी स्वस्त झाली असून डिझेल 93.43 रुपये प्रति लिटरने मिळतंय.
राज्यातील कोणत्या शहरात किती दर?
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.92 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.44 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108.75 रुपये, डिझेल 95.45 रुपये प्रति लिटर
परभणी : 109.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.86 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

Previous Post

यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज

Next Post

कोरोनाचा आलेख चढताच; देशात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Next Post
कोरोनाचा आलेख चढताच; देशात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

कोरोनाचा आलेख चढताच; देशात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group