येस न्युज मराठी नेटवर्क । इंधनाच्या वाढत्या दरांमुळे विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतातच कारण मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं धर्मेंद्र प्रधान म्हटलं आहे
“आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्याचा फटका ग्राहकांनाही बसला आहे. हिवाळा गेल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून, मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असतं, दर कमी होतील,” असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.