येस न्युज नेटवर्क : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पूर्ण देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलचा दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर हा नवीन दर लागू झाला आहे. मुंबईत आज सकाळी 6 वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव 104.15 प्रति लीटर तर डिझेलचा भाव 92.10 प्रति लीटर झाला आहे.