रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी, खाली दिलेल्या तपशिलांनुसार ट्रेन क्रमांक 22107/22108 आणि 22143/22144 यामध्ये कायमस्वरूपी ३ अतिरिक्त डब्यांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे:
२ अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच आणि १ अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच:-
१) ट्रेन क्रमांक 22107/22108 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – लातूर एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०१.१२.२०२४ पासून आणि
- लातूर येथून दि. ०२.१२.२०२४ पासून
२) ट्रेन क्रमांक 22143/22144 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – बीदर एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०४.१२.२०२४ पासून आणि
- बीदर येथून दि. ०५.१२.२०२४ पासून
ट्रेन क्रमांक 22107/22108 आणि 22143/22144 साठी सुधारित संरचना:
१ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे (एकूण २१ डबे)
वरील ट्रेनच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.