येस न्युज मराठी नेटवर्क । लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता ५९ चिनी अॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अॅप्सचा समावेश आहे.
या अॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता. आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.