सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रेल्वे विभागात महसुलाची ऐतिहासिक नोंद झाली आहे.सोलापूर विभागात क्रियाशील असणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी गण यांच्या प्रयत्नातून सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षपूर्तीचे लक्ष गाठून अधिकतम कमाई केली आहे. 2022-23 या मागील आर्थिक वर्षात वाणिज्य महसुलाची नोंद हि 1104.75 कोटी रुपये इतकी झाली होती . यंदाच्या वर्षी महसुलाची नोंद हि 1231.77 कोटी रुपये इतकी झाली आहे. हे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 11.50% ने वाढ असून , सोलापूर रेल्वे विभागाच्या आजवरच्या महसूल नोंदीच्या यादीत 2023-24 वर्षातील महसूल उत्पन्न हे सर्वाधिक आहे.
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने माल वाहतुकीत रु. 611.11 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 580.93 कोटीच्या तुलनेत 5.20% ची वाढ आहे. मालवाहतुकीच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने प्रवासी महसुलातून रु. 544.78 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 447.53 कोटीच्या तुलनेत 21.73% ची वाढ आहे. प्रवासी महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे . 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने तिकीट तपासणी महसुलातून रु. 34.74 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 33.71 कोटीच्या तुलनेत 3.03% ची वाढ आहे. तिकीट तपासणीमहसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे . 2023-24 मध्ये सोलापूर विभागाने अन्य महसुलातून रु. 19.96 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 18.42 कोटीच्या तुलनेत 8.36 % ची वाढ आहे. अन्य महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने वाणिज्य पब्लिसिटी महसुलातून रु. 2.12 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु. 1.75 कोटीच्या तुलनेत 20.62% ची वाढ आहे. तिकीट तपासणीमहसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .
2023-24 मध्ये सोलापूर विभागाने केटरिंग महसुलातून रु. 2.24 कोटींची कमाई नोंदवली. ही कमाई मागील आर्थिक वर्ष 2022-23 रु.1.46 कोटीच्या तुलनेत 52.90% ची वाढ आहे. केटरिंग महसुलाच्या आजवरच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने हि सर्वोत्तम अशी ऐतिहासिक कामगिरी आहे .