एकतर्फी असणारी अक्कलकोट मतदार संघातील निवडणूक माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना आपल्या गोठ्यात घेऊन निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सिद्धाराम म्हेत्रे करत आहेत.
सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे सिद्रामप्पा पाटील यांचे राजकारणातील अस्तित्व मागील पाच वर्षात थोडे तरी टिकून होते. सिद्रामप्पा पाटलांना आपल्या आणि आपल्या मुलांचे, नातवंडांचे राजकीय भविष्य चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे, निवडणुकीची संधी साधून आपल्या मुलांनातवंडांचे भविष्यातील शिदोरी गोळा करण्यासाठी काँग्रेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याबरोबर जाण्याची वेळ आली आहे.
राजकीय दृष्ट्या सक्रिय नसलेल्या सिद्रामप्पा पाटलांना सोबत घेऊन आपला गमावून बसलेला जनाधार थोडा तरी वाढवता येईल याचा केविलवाणा प्रयत्न म्हेत्रे यांनी केला.परंतु तरुण तडफदार व मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर सचिन कल्याणशेट्टी हे मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असे सामान्य जनतेचे, मतदारांचे मत आहे. त्यामुळे आता सचिन दादा पुन्हा आमदार होणार का? हेच पहावे लागेल?