सोलापूर:- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांचा भव्य सत्कार काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी क्रेन ने हार घालून, गुलाब पाकळयाचा वर्षाव करुण काँग्रेस भवनात स्वागत करण्यात आला.
यावेळी बोलताना नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी यांच्यामुळे मला प्रदेश कार्याध्यक्ष पदाची संधी मिळाली. पहिल्यांदाच पक्षाची मोट्ठी जबाबदारी मिळाली. मला संघटना चालवायची जास्त अनुभव नाही. पण आपल्या सारख्या अनुभवी जेष्ठ मंडळीकडून सल्ला घेऊन काम करण्याचे प्रयत्न करणार आहे. मा. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ज्या निष्ठहेने पक्षाचे काम आजपर्यंत केले. कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून काम करेन. कार्यकर्त्यामुळे आम्ही आहोत म्हणुन मला काँग्रेस कार्याध्यक्ष पदापेक्षा जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. मी कुठे चुकत असेल तर जरूर सांगावे. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहे.
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की काल मुंबईत आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोड़त, नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतला. आणि मोदी सरकार चले जाव चा नारा दिला. मोदी सरकार आल्यापासुन शेतकरयांवर होत असलेला अन्याय, महिला अत्याचार, दिन दलित मगासवर्गीयांवर होणारा अन्यायावविरुध्द आवाज उठवून हा देश भाजपमुक्त करायचे आहे. मोदी हटाव-देश बचाव, मजबूत कार्यकर्ता मजबूत देश हे आपण सोलापुरपासुन सुरूवात करू या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही मजबूत करण्यासाठी मी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपद स्वीकारत आहे.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, माजी महापौर, प्रवक्ते, ब्लॉक फ्रंटल सेल पदाधिकारी, शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.