आढावा बैठकीत वसुलीची टक्केवारी वाढविण्याच्या उपायुक्तांच्या सूचना
सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील मालमत्ता कराची थकबाकी, चालू डिमांड या रकमेपैकी किती रक्कम वसुल केली याबाबतीत कर निरीक्षक व वसुली सेवक यांचे समवेत मा. उपायुक्त सौ विद्या पोळ यांचे कक्षात आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये ५ टक्के १० टक्के पेक्षा कमी वसुल असलेल्या सेवकांना माहे फेब्रुवारी व मार्च मध्ये त्यांच्या मालमत्ता कराच्या वसुलीची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या अन्यथा सदर सेवकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली. तसेच ज्या सेवकांचे मालमत्ता कराच्या वसुलीची टक्केवारी जास्तीची आहे अशा सेवकांचे अभिनंदन करण्यात आले व कमी खुली असणाऱ्या सेवकांनी यांचा बोध घेऊन आपल्या कामकाजात सुधारणा करावी असे अवाहन करण्यात आले.
सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळविण्यात येते की, मिळकतदार यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा ज्या मिळकतदारानी मालमत्ता कराची रक्कम भरणार नाही अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करणे, जंगम मालमत्ता म्हणजे वाहन, टी.व्ही, फ्रीज इतर चालू वस्तु जप्त करणे, खाजगी नळ कनेक्शन बंद करणे इ. कटू कारवाई नाईलाजास्तव करण्यात येईल याची मिळकतदारानी नोंद घ्यावी तसेच यापुढे मालमत्ता कराच्या थकबाकीवर लावण्यात आलेली नोटीस फी, वारंट फी व शास्तीच्या रकमेमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येणार नाही याचीही मिळकतदारानी नोंद घ्यावी व मालमत्ता कराची रक्कम महानगरपालिकेत भरुन सहकार्य करावे असे अवाहन करण्यात येत आहे.