येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेस कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा अध्यक्षपदाचा निर्णय लांबणीवर टाकत आता मे महिन्यातील तारीख देण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत काँग्रेस अंतर्गत निवडणुका पार पडतील आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी 2019 मध्ये दिलेल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होईल असे आता सांगण्यात येत आहे .
पाच राज्यातील म्हणजे पश्चिम बंगाल ,तामिळनाडू ,आसाम, केरळ आणि पद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांनंतर म्हणजे मे महिन्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांना वाटत होते की , पाच राज्यातील निवडणुका नवीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली कळवण्यात येतील राहुल गांधी सध्या तरी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस कार्यकारिणीच्या गेल्या बैठकीत 23 नेत्यांनी पत्र पाठवून अध्यक्षपदाबाबत तातडीने मार्ग काढण्याची विनंती सोनिया गांधी यांना केली होती.सोनिया गांधी यांना लवकरात लवकर राहुल यांच्याकडे अध्यक्षपद सुपूर्द करायचे आहे .मात्र राहुल स्वतः मात्र अजूनही राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. गांधी कुटुंबीयाबाहेरचा चेहरा अध्यक्षपदासाठी निवडण्यात काँग्रेस अजूनही चाचपडत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. सध्या तरी काँग्रेसचे अध्यक्ष पद रिकामेच असून सोनिया गांधी यांच्या हंगामी नेतृत्वाखालीच काँग्रेसला पाच राज्यातील निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.