सोलापूर : आरोग्यसेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. यामुळे या शासकीय रुग्णालयात सलग दोन दिवस सुट्टी घेता येत नाही. यासाठी रविवारी ही छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सुरू होते. पण रुग्णांची संख्या कमी असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी तीन रुग्णांची शस्त्रक्रिया केली. यात दोन हार्नियाचे रुग्ण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज बाराशे ते दीड हजार रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. पण अनेक रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून आणि राज्यातून येत असतात. यामुळे दररोज ही संख्या दीड हजारपेक्षा जास्त पर्यंत जाते रविवारी रुग्णालयाला सुट्टी असल्याचे माहीत असते, पण १० तारखेला दुसरा शनिवार, दि. ११ तारखेला रविवार आणि १२ तारखेला बुद्ध पोर्णिमा असे सलग तीन दिवस सुट्टया आल्या. पण रुग्णसेवेत सलग दोन दिवस सुट्टी घेता येत नाही. यासाठी रविवारीही ओपीडी सुरू होती. पण रविवारची ओपीडी ही जेमतेम दीडशेपर्यंत असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, सकाळी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी हॉस्पिटलची पाहणी केली.
हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचारी वेळेवर येतात का, रुग्णांना डॉक्टर आणि इतर कर्मचारी वेळेवर देखभाल करतात का याची पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारपासून सात दिवस ही विशेष मोहीम घेतली जाणार आहे. यात काही त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता
ओपीडीची स्वच्छता
नेहमी हॉस्पिटलमध्ये गर्दी असते. त्या मानाने रविवारी हॉस्पिटल सुरू असूनही गर्दी कमी होती. यामुळे ओपीडीची व इतर विभागांची कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी हॉस्पिटलला अचानक भेट देत हॉस्पिटल प्रशासनावर व स्वच्छतेवर नाराजी व्यक्त केली होती.