सोलापूर – राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष मान. विवेक भाऊ पंडित यांनी आज दि. १७ ॲागस्ट, २०२१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पारधी वस्त्यांची पाहणी केली. तसेच, नियोजन भवन येथे, आदिवासी पारधिंसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शाभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रकल्प अधिकारी तथा, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी चर्चा केली. यावेळी पारधी समाज्याचे प्रश्न व त्यांच्या विकासाआड येणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला.
तसेच त्या समस्यांच्या निर्मूलनासाठी काय करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या. याला उपस्थित अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, अध्यक्षांनी केलेल्या सूचनांची आंमलबजावनी कालबध्द कार्यक्रम राबवून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मा. आमदार विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती’ची स्थापना केली आहे. या समितीद्वारे आदिवासी दुर्गम, आदिम, पारधी जमातींच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी श्री विवेक पंडित यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा आयोजित केला आहे.