अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे की, पंढरपूर येथील वन विभाग मार्फत 2019 ला तयार करण्यात आलेल्या तुळशीबाग मधील संत चोखामेळा व संत एकनाथ महाराज असे दोन मंदिर पडलेली आहेत. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच ही बाग – परिसर पाहण्यासाठी तिकीट ठेवण्यात आले आहे. भाविकांचा पैसा वाया गेला असून चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. तरी कोणत्या ही प्रकारे प्रशासना कडून हालचाल दिसत नाही. संबंधितांना पाठीशी घालण्याचा विचार दिसत आहे. तुळशी बागेतील सर्व काम निकृष्ट दर्जाचे आहे असे दिसून येते. पडलेल्या मंदिराचे पुढे काय करायचे. या बागेतील राहिलेली मंदिरे सुरक्षित आहेत असे समजायचे का असा प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होत आहे . त्यामुळे संबंधीत जे असतील त्यांचेवर ताबडतोब कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आल्याचे सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) , जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.