पंढरपूर – ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर, दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2024, सोमवार व मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न झाले. तर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, दिनांक 22 व 23 ऑगस्ट 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता शिबिर संपन्न झाले. पंढरपूर व अक्कलकोट तालुक्यात एकूण 3260 दिव्यांग लाभार्थीची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीहीन 422, बौद्धिक अपंगत्व 656, श्रवणदोष 517, लोकोमोटर अपंगत्व 1366, बालरोग 299 असे एकूण 3260 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर शिबिराचा पाचवा दिवस व बार्शी तालुक्याचा पहिला दिवस दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी शिबिर घेण्यात आले.
बार्शी येथील शिबिरात दोन दिवसात 1 हजार 599 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीने 170, बौद्धिक अपंगत्व 304, श्रवणदोष 268, लोकोमोटर अपंगत्व 585, बालरोग 137 तर औषधे देण्यात आलेले रुग्ण 135 आहेत, अशी माहिती संचालक अभिजीत राऊत यांनी दिली. तसेच माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी तपासणीसाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.