येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरासह भारतात करोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असला तरी करोनाची भीती मात्र कायम आहे. पॅनासोनिक इंडिया कंपनीने आज एक जबरदस्त टेक्नोलॉजी असलेला एअर कंडिशनर लाँच केला आहे. या एसीमध्ये नॅनो एक्स टेक्नोलॉजी दिली असून या टेक्नोलॉजीमुळे करोना विषाणू रोखण्यास मदत होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.हे नवीन नॅनो एक्स तंत्रज्ञान पाण्यामध्ये असलेले हायड्रोक्सिल रॅडिकल्स उत्सर्जित करते. हायड्रोक्सिल रॅडिकल्स ‘नेचर्स डिटर्जंट’ म्हणून देखील ओळखले जातात, ज्यांच्यामध्ये ९९.९९ टक्के नोव्हेल कोरोनाविषाणूच्या (सार्स-कोव्ह-२) प्रतिबंधासह जीवाणू व विषाणूंचे प्रतिबंध करण्याची क्षमता आहे.किंमत ६६,००० रूपये असेल.