सोलापूर : बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था, क्रेडाई सोलापूर तर्फे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले. सोलापुरातील गृहप्रकल्प व बांधकाम साहित्यांची माहिती एकाच छताखाली मिळावी ह्या हेतूने क्रीडाई एक्स्पोचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी क्रेडाई एक्सपो २ ते ५ फेब्रुवारी २०२४ नॉर्थकोट मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळेस सोलापूरचे क्रेडाई अध्यक्ष अभय सुराणा, सचिव संतोष सुरवसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे, शशिकांत जिद्दीमनी, अभिनव साळुंखे, आनंद पाटील उपस्थित होते.