येस न्युज नेटवर्क : पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर एका भारतीय मच्छिमाराची हत्या केली आहे. गुजरातमधील द्वारका येथे ओखा शहराजवळील ‘जलपरी’ नावाच्या बोटीवर पाकिस्तानी मरीनने गोळीबार केला होता. या गोळीबारात श्रीधर नावाच्या एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक महितीची प्रतीक्षा आहे. मार्चमध्ये पण पाकिस्तानने 11 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती आणि त्यांच्या दोन बोटी जप्त केल्या होत्या. फेब्रुवारीमध्येही, पाकिस्तानने 17 भारतीय मच्छिमारांना देशाच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आणि त्यांच्या तीन बोटी ताब्यात घेतल्या.