सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर संगीत विद्यालय येथे पखवाज वादनाचे क्लासचे उद्घाटन ह. भ. प.स्वामी महाराज राशीनकर पंढरपूर , व अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प. अभिमन्यू महाराज डोंगरे, प्राचार्य किरण जोजरे,ह भ प ज्योतीराम चांगभले, विश्वजित जोगदंड ,सुदर्शन राऊत , श्रीनिवास हिबारे उपस्थित होते. या शिबिरामध्ये शास्त्रीय पखवाज व वारकरी संप्रदायिक पखवाज सोमवार व मंगळवार सांय 6 ते 8 या वेळेत शिकवण्यात आले. ज्यांना पखवाज वादन शिकण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी 9850967139 या मोबाईल वर संपर्क साधावा. हे शिबीर सिद्धेश्वर प्रशाला होम मैदान शेजारी येथे आयोजित कऱण्यात आले होते.