पुणे- महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना पुण्यात शनिवारी (28 नोव्हेंबर) ‘समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)चे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार चंद्रकांत भुजबळ यांना महात्मा फुले समता गौरव पुरस्काराने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.