2023-24 या आर्थिक वर्षात सोलापूर रेल्वे विभागात, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय अभियंता(समन्वय) चंद्रभूषण यांच्या देखरेखीखाली अभियांत्रिकी विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वसाधारणपणे रेल्वे विभागात अभियांत्रिकी विभाग हा तांत्रिक स्वरूपातील सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करणारा विभाग मानला जातो. रेल्वे ट्रॅक आणि सुरक्षा प्रवासी सोयीसुविधा,भूसंपादनाची अधिकृत जबाबदारी या विभागाची असते.
अभियांत्रिकी विभागाची कामगिरी –
ट्रॅकची सुरक्षितता वाढविली
54.059 किलोमीटर चे दुहेरीकरण आणि 32.841 किलोमीटर च्या नवीन लाईन ची निर्मिती करण्यात आली.
दौंड ते वाडी दरम्यान 338 किलोमीटर अंतराच्या ट्रकची 130 किलोमीटर प्रति तास वेगाने चाचणी यशस्वीरित्या संपन्न
22.67 किलोमीटर इतक्या एकुणांत अंतराचे तारेचे कुंपण केले गेले.( सुरक्षा च्या दृष्टीने अति संवेदनशील परिसरात)
5 रेल्वे स्थानकांचे LC गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले.80 रेल्वे स्थानकावरचे गेट चे रूपांतर RUB मध्ये करण्यात आले.
जमिनीच्या संसाधनातून मिळालेली कमाई
2023-24 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे विभागाकडून 6.37 कोटींचे लक्ष देण्यात आले होते . लक्षच पाठलाग करत असताना सोलापूर रेल्वे विभागाने तब्बल 10.36 कोटींचे लक्ष गाठले. दिलेल्या लक्षापेक्षा कमाईची रक्कम हि 162 % ने जास्त आहे.
सेवांची वाढवलेली व्याप्ती
75 नवीन रेल आवास ची निर्मिती केली.
227 नवीन कर्मचारी रेल आवासाची दुरुस्ती वजा डागडुजी केली.
लातूर,उस्मानाबाद आणि बार्शी टाऊन येथे रॅम्प ची निर्मिती केली .
वाडी रनिंग रूम मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी अतिरिक्त 27 बेड ची निर्मिती
बेलवंडी,अकोळनेर,बेलापूर,कोपरगाव,लातूर,मोडनिंब आणि अरग या 7 रेल्वे स्थानकांवर ट्रॅक मशीन सायडिंग ची निर्मिती केली.
प्रवाश्यांच्या सुविधांची वाढ
16 रेल्वे स्थानकावर COP (cover over platform) ची निर्मिती केली .
जिंती रोड, पारेवाडी, केम ,बेलवंडी,श्रीगोंदा स्थानकावर FOB(foot over bridge) ची निर्मिती
कोपरगाव या रेल्वे स्थानकावर 2 लिफ्ट ला मंजुरी मिळाली असून गंगापूर रेल्वे स्थानकावर 2 लिफ्ट ची निर्मिती केली आहे.