सोलापूर, दिनांक 12:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.
व्याज परतावा योजनेमध्ये बॅकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12% पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बॅकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
*महामंडळाच्या विविध कर्ज योजना:-
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- बॅकेमार्फत लाभार्थीस व्यवसायासाठी रू.10 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून 12% च्या मर्यादेत, अनुदान स्वरूपारत देण्यात येते. अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे.
- शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:- बँकेमार्फत विद्यार्थीस उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रू.10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20 लक्ष होते इतके कर्ज वितरीत करण्यात येते. कर्जावरील व्याचाजी रक्क महामंडळाकडून 12 च्या मर्यादेत, अनुदान स्वरूपात देण्यात येते, या कर्जासाठी अर्जदार इयत्ता बारावीत 60% व अधिक गुणांची उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे.
3 .गट कर्ज व्याज परतावा योजना:- बँकेमार्फत बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, इत्यादींना व्यवसायासाठी 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावारील व्याजाची रक्कम महामंडळाकंडून 12%च्या मर्यादेत, अनुदार स्वरूपात देण्यात येते. - थेट कर्ज योजना:- ही योजना महामंडळामार्फत राबवली जाते, त्यात महत्तम कर्ज मर्यादा 1 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. या योजनेत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते, अर्जदाराचे वय 18 ते 55 असावे.
5.महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील बचत गटातील उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांसाठी बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लक्षपर्यंतच्या कर्म रक्कमेवरील 12% व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते. योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. - 20% बीज भांडवल योजना:- या योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाते, त्या महामंडळाचा सहभाग 20% लाभार्थींचा 5% व बँकेचा सहभाग 75% आहे. अर्जदारचे वय 18 ते 50 असावे.
इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी वरील कर्ज योजनांसाठी ऑनलाईन कर्ज अर्ज www.msobcfds.org किंवा www.msobcfde.in या संकेतस्थळावर दाखल करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालयास 0217-2512595 येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, सोलापूर यांनी कळविले आहे.
00000