सोलापूर : (समाधान रोकडे) उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावामधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातील वाढलेले गवताचे प्रमाण कमी करण्यासाठी तननाशक फवारणी करण्यात आली. दिवसेंदिवस डेंग्यू,मलेरिया व अनेक साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे लोकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न वाढत आहे. गावातील आरोग्याच्या दृष्टीने तणनाशक फवारणी होणे गरजेचे होते.गावतील सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणी गवताचे प्रमाण वाढले होते. हे लक्षात घेऊन युगप्रवर्तक बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अतिश गवळी यांनी गावातील घरासमोरील व मोकळ्या जागेत वाढलेल्या गवतावर तन नाशक फवारणी केली. यामुळे फवारणी केलेल्या भागातील डासांचे प्रमाण कमी होणार आहे व परिणामी साथीच्या रोगांवर नियंत्रण येणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव कुमार गवळी उपस्थित होते.