सोलापूर – आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या संकल्पनेतून व आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे सोलापूर जिल्हा मराठा सेवा संघ व वधुवर कक्षाच्यावतीने गेली तीस वर्ष अखंडीतपणे वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. मेळाव्याच्या निमित्ताने विवाह इच्छुक मुला-मुलिंचा परिचय व्हावा पालकांची भेट व्हावी व विवाह जमणे सोयीचे व्हावे या हेतूने मेळाव्याचे आयोजन केले जाते. आजवर या मेळाव्यातून अनेक विवाह जुळले आहेत. सेवा संघाचे जाळे महाराष्ट्र व इतर राज्यातही कार्यरत असल्याने अंतर जिल्हा, अंतर राज्य विवाह जुळण्यास मोलाची मदत झाली..
रविवार दिनांक २८ मे रोजी शिवस्मारक सभागृह शिदे चौक सोलापूर येथे सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामधे सोलापुरसह मराठवाडा व प.महाराष्ट्रातील काही जिल्हे यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाज बांधवांच्या सोयीसाठी मेळाव्या दिवशी भोजन व्यवस्था केली आहे. तसेच वधूवर नोंदिची पुस्तिका देण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात मुलींच्या स्थळांची संख्या कमी होत असल्याने मुलींच्या नोंदीसाठी जास्तीचे प्रयत्न केले जाणार आहेत.. विवाह व्यवस्था यथायोग्य टीकवल्यास कुटुंब व्यवस्था सुदृढ होईल व समजोधरासाठी उपुक्त ठरेल.या हेतूने सेवा संघ सर्व स्तरावर मेळाव्याचे आयोजन करत आहे, अशी माहिती मराठा सेवा संघ मराठा वधुवर परिचय कक्षाने दिली आहे.