सोलापूर विज्ञान केंद्र आपला 15 वा वर्धापन दिन दिवस साजरा करून सोळाव्या वर्षात पदार्पण करीत आहे, या प्रसंगाचे औचित्य साधून दि. 14/02/2025 रोजी संध्याकाळी 05.00 ते 06.00 या वेळेत सोलापूर विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 14 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शैक्षणिक वैज्ञानिक मॉडेल बनवण्याची स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास एम. यांनी केले आहे.
14/02/2025 रोजी सूर्यास्तानंतर शुक्र ग्रह आकाशात सर्वात तेजस्वी आणि सर्वोत्तम दिसणारआहे. नाममात्र शुल्कात आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी 02172992222, 9405545780 आणि 9175626145 या मोबाईल क्रमांकावर सकाळी 10.00 ते संध्या. 05.30 च्या दरम्यान (सोमवार वगळून) संपर्क साधावा.