सोलापूर दि.०४- हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वालचंद आर्ट अॅण्ड सायन्स महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थ्यांना उद्योगशील बनविण्यासाठी उद्यमदीप चे आयोजन करण्यात आले आहे. उदयोजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत उद्यमशीलमंचातर्फे मंगळवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ व बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ८.०० आणि गुरुवार दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत उद्यमदीप अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. दिपावलीच्या सणासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच छताखाली विद्यार्थ्या मार्फत माफक दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
आजच्या विद्यार्थ्यांनी फक्त पदवी पुरते मर्यादित न राहता वर्तमान आणि भविष्याची गरज ओळखून आपल्यातील कौशल्य विकसित करुन उद्यमशील बनले पाहिजे या उददेशाने हा उपक्रम राबविला जात आहे. उद्यमदीप या उपक्रमाचे उदघाटन मंगळवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता निशांतकुमार जायसवाल, क्षेत्रीय प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सोलापूर यांच्या हस्ते व वालचंद शिक्षण समुहाचे सर्व विश्वस्त, वालचंद समुहातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर उपक्रमात दिपावली सणासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू पणती, आकाश दिवे, सजावट साहित्य, फराळाचे पदार्थ, मसाले, कपडे इत्यादी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सोलापूर शहर, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक व नागरिक यांना यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच सर्वान प्रवेश विनामुल्य असून सदर उपक्रमास भेट देवून भरभरुन खरेदी करण्याचे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. संतोष
कोटी यांनी केले आहे.