सोलापूर, दिनांक – 12 (जिमाका) – जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर व सोलापूर (मुलींची) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक १५ जुलै, २०२४ रोजी “नॉर्थ कोट प्रशाला, पार्क चौक, सोलापूर” येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त हणमंत नलावडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
मेळाव्यात सोलापूर औद्योगिक परिसरातील १५ नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत.या रोजगार मेळाव्यात १० वी, १२वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, एम.बी.बी.एस., बी.फार्म, एम.फार्म, एम.बी.ए. अशा प्रकारी एकुण १९९६ पेक्षा जास्त रिक्तपदे सोलापूर आणि पुणे येथिल उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह सोमावार, दिनांक १५ जूलै २०२४ रोजी ठीक १० वा. “नॉर्थ कोट प्रशाला, पार्क चौक, सोलापूर” येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.