सोलापुरात जागतिक महिला दिनानिमित्त सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून “हिरकणी राईड” आयोजित करण्यात आली होती. सोलापुरातील पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा येथून योगा अभ्यासक श्रीमती स्नेहल पेंडसे यांचे हस्ते झेंडा दाखवून राईड ला सुरुवात झाली. आसरा चौक दावत चौक येथून कंबर तलाव येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रेल्वे स्टेशन भैय्या चौक मार्गे परत पार्क चौक अशा बारा किलोमीटर अंतराची ही राईड उत्साहाच्या भरात महिला सायकलिस्ट यांनी पूर्ण केली.
यामधे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 35 महिलांनी सहभाग नोंदवला. त्यांना सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सदर राईड चे नियोजन महिला समन्वयक डॉक्टर रूपाली जोशी, डॉक्टर राजश्री वाघचौरे ,डॉक्टर मंजुषा ननवरे यांनी केले. ही राईड यशस्वी करण्यासाठी सायकल लवर्स ग्रुप चे श्री महेश बिराजदार इंजि. अमेय केत, श्री अविनाश देवडकर , श्री प्रवीण जवळकर, डॉ. प्रवीण ननवरे यांनी परिश्रम घेतले.
“आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांचे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘इमर्जिंग टूवर्ड्स फिटनेस’ हा कन्सेप्ट घेऊन आम्ही यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी राईड आयोजित केली. महिलांनी कुटुंबाच्या जबाबदारी सोबत स्वतःच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम आहे. महिलांना छोटी छोटी कामे करीत सायकलिंग करता येऊ शकते. सुट्टीच्या दिवशी आम्ही सायकल लवर्स च्या महिला सदस्य एकत्र येऊन ग्रुप राईड करतो. त्यात सोलापुरातील महिला नी सहभगी व्हावे यातून सायकलिंग चा आनंद घेत आपले आरोग्य ही उत्तम राखण्यास मदत होईल.
-डॉक्टर रूपाली जोशी
समन्वयक, हिरकणी राईड.