No Result
View All Result
- सोलापूर : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खांडये, हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र राज्य समन्वयक मनोज खाडये, हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक निलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या निमित्ताने गेल्या एक महिन्यापासून सोलापूर शहरासह आजूबाजूच्या 75 गावांमध्ये प्रचार सुरू आहे. या सभेच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत शहरातून दोन पद फेऱ्या काढण्यात आल्या आहेत.
- आज सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता कन्ना चौक ते तुळजापूर वेस या भागातून पदफेरी करण्यात येणार असल्याचेही बुणगे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत हिरालाल तिवारी , बापूसाहेब ढगे, सत्यनारायण गुर्रम आदी उपस्थित होते.
No Result
View All Result