नाव नोंदणीस प्रारंभ
सोलापूर : परसबाग सोलापूरची उपक्रमीत बोन्साय क्लब, सोलापूर च्यावतींनें डिसेंबर २३ मध्ये बोन्साय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
वामनवृक्ष ही संकल्पना प्राचीन भारतीय संकल्पना असुन बोन्साय ही जपानी वृक्षकला आहे. यासाठी सोलापूर आणि परिसरातील बागकर्मी आणि बोन्सायप्रेमीं आपली नाव नोंदणी करु शकणार आहेत. यानिमित्तानें बोन्साय मधील जाणकार तज्ञांची व्याख्याने आयोजिण्याचा मानस आहे.
अलीकडच्या काळात सोलापूर आणि परिसरातील घराघरातून परसबाग,टेरेस गार्डन लावण्याचे प्रमाण मोठे आहे. या परसबागांमधुन फळझाडे,फुलझाडे, भाजीपाला या बरोबरच कॅक्टस, बोन्साय,अडेनियम,आॅर्चिड लावले जाते.अशा प्रकारच्या बागकामासाठी कोणताही विशिष्ट अभ्यासक्रम सोलापूरात उपलब्ध नाही.
कोकणातील सुगंधराज वेलणकर सोनचाफा हा बारमाही हंगामाचा स्वर्णवर्णी नवीन वाण रुजवण्यास सोलापूरातील सकल बागप्रेमींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.शहाणे करावे सकल जनां… या उक्तीनुसार परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठानें *दैनंदिन बागकर्मींसाठी विविध असे प्रयोगशील आणि अभ्यासपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे.त्यानुसार काही महिन्यांपूर्वी सोलापूरात *बोन्साय क्लब* आणि अडेनियम क्लब कार्यान्वित करण्यात आले आहेत.
सर्वसामान्य बागप्रेमी आणि निसर्गप्रेमींना वामनवृक्ष आणि बोन्साय यातील फरक समजावुन देत बोन्साय कलेचा सहज परिचय करुन देणे आणि सहज ज्ञान हस्तांतरीत व्हावे यासाठी सर्वसामान्य बागकर्मी, बोन्सायप्रेमींच्या ज्ञान वृध्दीसाठी तज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा,अभ्यास सहली आयोजित करण्यात येणार आहेत.
नाविन्याची कास धरु पाहणा-या संयमशील बागकर्मींनी प्रदर्शनात सहभागी अवश्य सहभागी व्हायला हवे. बोन्साय प्रेमी बागकर्मींनी नाव नोंदणी करुन प्रदर्शनातील आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा.अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ९९६०००८२२० या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन *बोन्साय क्लब – सोलापूरच्यावतीनें करण्यात आले आहे.