खेळामुळे आपले आरोग्य उत्तम राहते– आयुक्त शीतल तेली-उगले
सोलापूर – मुलांनी आपल्या अंगातील कौशल्य खेळात दाखवावे हसत खेळत खेळाच्या सामन्यात भाग घ्यावे उज्वल यश संपादन करावे, खेळामुळे आपले आरोग्य उत्तम राहतें असे प्रतिपादन मनपा प्राथमिक शिक्षण विभातर्फे आयोजित ५९ व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुलांना शुभेच्छा देतांना प्रतिपादन महापलिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मनपा प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ५९ व्या आंतर शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप-आयुक्त विद्या पोळ यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, दि. ६, ७, ८ या तीन दिवसाच्या क्रीडा महोत्सावाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी हणुमंत जाधवर यांनी केले. क्रीडा महोत्सवात शहरातील मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे. या क्रीडा महोत्सवाचे नियोजन पर्यवेक्षक मनिष बांगर यांनी तर आभार पर्यवेक्षक भगवान् मुंढे यांनी केले. सुत्रसंचालन सरोजनी नादगी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक संतोष बुलबुले, सुरेश कासार, रजनी राऊळ, निलोफर सय्यद, कलाशिक्षक फैय्याज शेख शाहबाज काझी, संजये चाटला निशीकांत जगताप यांनी परिश्रम घेतले.