No Result
View All Result
- सोलापूर – महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व महात्मा बसवेश्वर ब्लॅड बैंक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ मार्च २०२३ रोजी रविवारी सकाळी ११ ते ४ डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी पत्रकार परिषद माहिती दिली.
- लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प.पु. बसवलिंग महास्वामीजी शिवयोगी मठ,सोलापूर, प. पु. स्वामीनाथ महास्वामीजी किरीटीश्वर मठ सोलापूर, बसव केंद्राचे प्रमुख सिंधुताई काडादी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या शुभ हस्ते व महात्मा बसवेश्वर ब्लॅक बँकचे चेअरमन विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.
- यावेळी प्रमुख पाहुणे दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक रेवणसिद्ध जवळेकर, शंकरराव लिंगे-अध्यक्ष अखिल भारतीय माळी संघ,सकलेश भाबुळगावकर, पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ , नामदेव फुलारी,आनंद मुस्तारे, रेवणसिध्द बिजरगी,लिंगायत महासंघाचे सचिन शिवशक्ती, सचिन तुगावे, सिद्ध मल्लिकार्जुन संस्थेचे अध्यक्ष गणेश चिंचोळी ,राजश्री थळंगे अध्यक्ष शंकरलिंग महिला भक्त मंडळ,धर्मप्रसारक मल्लिकार्जुन मुलगे,प्रशांत कोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
- महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीने सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, गुडापूर, या ठिकाणी मेळावा घेण्यात आला असून व पुढील मेळावे बेळगाव, विजापूर, अथणी या ठिकाणी नियोजित असल्याने याचा फायदा सोलापूर मेळाव्यातील वधुवरांना होणार आहे. सामाजिक बांधलिकीतून उपक्रम घेवून सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये मेळावा आयोजित करण्यात येत असल्याने यांचा फायदा जास्तीत जास्त बांधवाना होतो. सोलापूर या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये नोंद करुन सहभागी होणाऱ्या वधुवरांना संस्थेच्या वतीने २०२१ मध्ये व २०२२ मध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेले मेळाव्याचे दोन पुस्तके भेट म्हणून देण्यात येणार आहे व सांगली येथे ११ मार्च रोजी झालेल्या मेळाव्याचे व १९ मार्च रोजी पुणे येथे झालेल्या मेळाव्याचे व २६ मार्च रोजी सोलापूर येथे होणान्या मेळाव्याचे एकत्र पुस्तक प्रकाशित करून वधुवरांना दिलेल्या पत्यावर पाठविण्यात येणार आहे. तरी यांची नोंद घेऊन जास्तीत जास्त समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे चेअरमन विजयकुमार हत्तुरे व अखिल भारतीय माळी संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केले आहे.
No Result
View All Result