सोलापूर : ग्रामीण जिल्हातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, जिल्हयातील अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री ठिकाणे (HOT SPOT) वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना दत्तक देवून सदर ठिकाणावरील अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून ऑपरेशन परीवर्तन’’ हे राबविण्यात येत आहे.
सदर ठिकाणचे दारू निर्मीती व विक्री करणारे लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना सदर अवैध धंद्यापासून परावर्तीत करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या पदाचे अधिकारी यांना सदरची ठिकाणे दत्तक देण्यात आलेली आहेत. अवैध दारू निर्मीती लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना इतर कायदेशीर व सन्मानजनक व्यवसायासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे. तरी संबंधीत गावातील नागरिकांनी सदर मोहीमेमध्ये पोलीस अधिकारी यांना सत्य व गोपनिय माहिती देवून सहकार्य करावे.