विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून एका मागोमाग एक बडी नेते शिंदे गटात दाखल होत आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या घरी भोजनाला उपस्थिती लावल्याने एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार याची शक्यता वर्तवली दिली जात आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी ठाकरेचे खासदार संजय जाधव खासदार नागेश पाटील आष्टीकर तसेच खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे स्नेहभोजनासाठी उपस्थित होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून हे तीनही खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे तातडीने दिल्लीला रवाना रवाना झाले असून ते इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे नऊ खासदार आहेत त्यापैकी सहा ते सात खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू होते त्यात पाच खासदार गळ्याला देखील लागल्याचे बोलले जात आहे