श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दहशतवादी कट उधळून लावला आहे. श्रावणी सोमवारी (28 जुलै) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या मोठ्या चकमकीत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातराबवलेल्या या मोहिमेला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव‘ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’ने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती शेअर केली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारत दहशतवाद्यांच्या आकांचे कंबरडं मोडलं आहे. मात्र अद्यापहि पाकड्यांची खोड मुडली नसल्याचे पुढे आले आहे. अशातच कंठस्नान घातलेले तिघे अतिरेकी पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असली, तर यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भारतीय सैन्याने गेल्या काही दिवसांपासून या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. येथे दहशतवादी लपल्याची शक्यता होती. या संदर्भात लष्कराने ‘ऑपरेशन महादेव’ सुरू केले. मारले गेलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित आहेत की नाही याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.