सोलापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ३०/११/२०२१ ला बजावलेल्या ‘क्लोजर नोटीस शी प्रमाणे शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे पाणी बंद करण्यात आले आहे व आता वीज बंद होईल परंतु कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अत्यंत संयमाने प्रशासनास मदत करावी कारण कारखाना अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी स्वतःच्या हाताने कोणत्याही प्रशासकीय परवानग्या न घेता व वारंवार प्रशासनाची व कोर्टाची दिशाभूल करून व कारखाना सभासदांचे पैसे वापरून २०१४ साली बेकायदा कॉजनरेशन व विस्तारीकरण प्रकल्प केला होता. ही ९० मीटरची बेकायदा बांधलेली को-जनरेशन चिमणी काढून टाकावी असे डीजीसीए व उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करून २०१९ डिसेंबर रोजी निकाल दिलेले आहेत.२१/१२/२०२० च्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही चिमणी १ महिन्यानंतर पाडणे महापालिकेस क्रमप्राप्त होते.तसेच धर्मराज काडादी यांनी याबाबत पुन्हा कोर्टात येऊ नये अशी अत्यंत स्पष्ट व त्यांच्यावर घातलेली अटआहे त्यामुळे आता त्यांना कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा कोर्टाकडून याला स्थगिती मिळणार नाही.
एवढे असताना सुद्धा धर्मराज काडादी मी चिमणी नियमित करून घ्यायचे प्रयत्न करत आहे असे सर्व सभासद व सोलापूरकरांना खोटे सांगत आहेत. सोलापूरच्या सुसज्ज अशा होटगी रोड विमानतळास या बेकायदा चिमणीचा प्रमुख अडथळा असल्यामुळे २०१४ पासून येथून मोठी विमाने उतरणे बंद झालेले आहे व ही चिमणी पाडकाम साधारणत एक ते दोन आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पुन्हा पूर्ववत आपल्या जुन्या चीमण्यावर गाळप सुरू करू शकतो.तसेच येथील विमानसेवा ही त्वरित चालू होईल याबद्दल सोलापूर विमान प्राधिकरणाने जय्यत तयारी सुरू केलेली आहे. दरम्यान काही माध्यमातून काडादी सुडाच्या भावनेतून मला वेठीस धरण्यात येत आहे व हे षड्यंत्र आहे असे वारंवार सांगत आहेत.
खरेतर हे काम सोलापूर जिल्हयातील ५० लाख लोकांच्या प्रदूषणाचा महाभयंकर प्रश्न व पर्यायाने येथील प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व डीजीसीए यांच्या अत्यंत कठोर ऑर्डर्स नंतर मोठ्या दिरंगाईने होत आहे.२०१४ सालापासून हा कारखाना ७५०० मेट्रिक टन दर दिवशी तीन पट विनापरवाना गाळप करत आहे व त्यामुळे या भागातील हवा, पाणी व जमीन यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन कायमस्वरूपी नुकसान झालेले आहे.
याबाबत गेल्या दहा-पंधरा वर्षात कारखान्याच्या वीस किलोमीटर परिसरातील मदे, सावरखेड, होटगी अशा गावातील बहुसंख्य नागरिकांनी व ग्रामपंचायतींनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याच्या लेखी तक्रारी करून सुद्धा नुसत्या नोटीस बजावण्या पलीकडे काही ठोस कारवाई होत नव्हती.सोलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचा धर्मराज काडादी यांना कोणी अधिकार दिला? उलट त्यांनी सर्व सोलापूरला काही राजकीय पाठबळ वापरून, षडयंत्र करून वेठीस धरले आहे. ते व त्यांचे काही समर्थक विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत व मोठी धावपट्टी मुद्दामहून बंद केलेली आहे असे खोटे सांगत आहेत. सत्य परिस्थिती अशी आहे कि या विमानतळावर दोन किलोमीटरची एकच धावपट्टी आहे पण विमाने दोन्ही बाजूंनी उतरु शकतात किंवा उड्डाण घेऊ शकतात. त्याला दोन धावपट्ट्या म्हणत नाहीत. परंतु या बेकायदा चिमणीमुळे आज ही धावपट्टी फक्त ८०० मीटर वापरात राहिलेली आहे.याव्यतिरिक्त इतर छोटे मोठे असे २५ अडथळे आहेत असे सुद्धा ते सांगतात ते अतिशय किरकोळ आहेत व त्यापैकी बहुतांश आडथळे हे महापालिकेने व मालकांनी स्वतः काढून टाकलेले आहेत व विमान प्रधिकरण काही अडचणी किंवा त्रुटींवर ठोस कारवाई करताना दिसत आहे.नेहमीच गाळप सुरू असताना चिमणी पाडकामाचा प्रश्न राजकीय सूडबुद्धीने आणला जातो असे ते म्हणतात परंतु काही राजकीय लोकांच्या दबावाखाली जानेवारी महिन्यात होणारे पाडकाम काडादीने मुद्दाम हून मंत्रालयामध्ये नऊ महिने लटकवून ठेवले होते. त्याला काडादींचे षड्यंत्रच कारणीभूत आहे. आता सभासदांनी पुढाकार घ्यायला हवा असे काडादी का म्हणत आहेत? ज्या वेळी ही बेकायदा कामे करून कारखान्याचे कोट्यावधी रुपये मातीमोल केले व गेली आठ वर्ष कारखान्याची बदनामी केली व सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ केला त्यावेळी एका सभासदाला तरी विचारले का? याचे उत्तर धर्मराज काडादी यांनी सर्व जनतेस देण्याचे गरजेचे आहे. काही माध्यमातून काही लोक चिमणीच्या नावावर वातावरण पेटवत आहे असे लिहीत आहेत, खरेतर सोलापूर विचार मंचच्या सर्व सदस्यांनी हे अत्यंत संवेदनशील प्रकरण अतिशय संयमाने व शासनातील सर्व विभागांना सातत्याने मदत व पाठपुरावा करून तडीस आणलेले आहे त्यामुळे शासनातील सर्व विभाग नेहमीच आमच्या सभासदांचे ऋण मानतात. एवढेच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसात सोलापूर व जिल्ह्यातील असंख्य संस्थांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे विमानतळ त्वरित सुरू होण्या बाबत निवेदने देऊन आम्हाला भक्कम पाठिंबा दिलेला आहे. कोजनरेशन चिमणी पडल्याने कारखान्याचे किंवा सभासदांचे काहीही नुकसान होणार नाही. कारखाना पुन्हा दोन आठवड्यात सुरूच राहणार आहे परंतु कारखान्याची नेहमीसाठी मुक्ती होईल , तसेच प्रशासनाची डोकेदुखी कायमची बंद होईल व नागरी विमान सेवेचा मार्ग मोकळा होऊन येथील उद्योगधंदे झपाट्याने वाढीस लागतील व जे नवीन उद्योग येथे येऊ पाहत आहेत त्यामुळे येथील सर्व स्तरातील लोकांना उद्योग मिळेल व गेली वीस-पंचवीस वर्षात जी पीछेहाट झाली ती एक-दोन वर्षात भरून निघेल व सोलापूर इतर मोठ्या शहरांच्या बरोबरीने उभारी घेईल यात आता कोणतीही शंका उरलेली नाही.
सोलापुर शहरवासीयांची आजवर धर्मराज काडादी यांनी फसवणूक केली आहे. वारंवार खोटी वक्तव्य करून आपली बेकायदेशीर कृत्ये लपविण्यासाठी त्यांनी आजवर प्रयत्न केले आहेत. शेतकरी सभासद आणि संचालकांना विश्वासात न घेता आणि कोणतीही परवानगी न घेता काडादी यांनी हट्टापायी २०१२ पासून बेकायदेशीरपणे कोजनरेशन ९० मीटर उंचीची नवीन चिमणी उभारण्यास सुरुवात केली त्यावेळी पासून महापालिकेने तसेच विमानतळ प्राधिकरणाने या बेकायदेशीर चिमणीचे बांधकाम थांबवावे असे सांगितले.मात्र काडादी यांनी वारंवार खोटे बोलून आणि सर्व संचालक व सभासदांना अंधारात ठेवून ही चिमणी उभारलीच. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राष्ट्रीय हरित लवाद यांचे नियम धाब्यावर बसून प्रदूषण करणारी ही बेकायदेशीर चिमणी काडादी यांनी उभारली. त्यांच्या बेकायदेशीर पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. छोट्या छोट्या शहरांमध्ये नियमित विमानसेवा सुरू झाली आहे, मात्र केवळ चिमणीच्या हट्टापायी सोलापूरची विमानसेवा गेली सात वर्षे थांबली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता तातडीने ही चिमणी पाडावी अशी मागणी कारखान्याचे तज्ञ संचालक संजय थोबडे यांनी केली आहे. चिमणी पाडल्यानंतर कारखाना बंद होणार नाही. ही वीज निर्मितीची चिमणी आहे. त्यामुळे काडादी याबाबत सभासदांची दिशाभूल करत आहेत. मी कारखाना व्यवस्थापनास, तसेच काडादी यांना वेळोवेळी इमेल पाठवून जुने बॉयलर तसेच तदअनुषंगिक सर्व मशिनरी तयारी ठेवण्यास सांगितले होते, ते जर त्यांनी ठेवले असल्यास चिमणी पाडल्यानंतर पुन्हा लगेच कारखाना सुरू करता येतो. तसेच जर काडादी यांनी ती यंत्रणा तयार ठेवली नसेल तरीदेखील पंधरा दिवसात यंत्रणा कार्यान्वित करून पुन्हा कारखाना चालू करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी सभासद उत्पादकांनी तसेच कामगारांनी आणि ठेकेदारांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. काडादी हे वारंवार ही चिमणी कायदेशीर असल्याचे खोटे सांगत असून वस्तुतः ही चिमणी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया ,माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालय यांनी बेकायदेशीर ठरवलेली असून काडादी यांनी ‘एन्व्हायरमेंट क्लिअरन्स’ व प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतेही परवानगी न घेता हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे तातडीने सर्व यंत्रणांनी काम करावे आणि ही चिमणी पाडावी अन्यथा सोलापुरात याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा थोबडे यांनी दिला आहे. सोलापुरातील उद्योग,व्यापारी तसेच तरुण वर्ग या विमानसेवेची वाट पाहत आहे येत्या तीन-चार महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘उडाण’ योजनेतील विमानसेवा सुरू न झाल्यास पुन्हा एकदा ती विमानसेवा नाही याकडे देखील सोलापूरकरांनी लक्ष द्यावे असे. कामगारांनी, सभासदांनी तसेच समाज बांधवांनी आणि शहरवासीयांनी काडादी यांच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नये वस्तुस्थिती आणि कागदपत्रे पहावीत असे आवाहन सोलापूर विचार मंच तर्फे केले आहे.