• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्णबधिरांना व्यवसाय कौशल्येच आत्मनिर्भर बनवतील – चंद्रिका चौहान

by Yes News Marathi
January 27, 2026
in इतर घडामोडी
0
कर्णबधिरांना व्यवसाय कौशल्येच आत्मनिर्भर बनवतील – चंद्रिका चौहान
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूक बधिर विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उद्योगवर्धिनी, सोलापूर या संस्थेच्या संस्थापिका चंद्रिका चौहान या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी आपल्या मनोगतात चंद्रिका चौहान म्हणाल्या की, कर्णबधिर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध व्यवसाय कौशल्यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. ही कौशल्येच त्यांना अर्थार्जनाची संधी देऊन आत्मनिर्भर बनवतील. तसेच समाजाने या मुलांकडे ममत्वाने, आत्मीयतेने पाहिले पाहिजे, अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रोटेरियन आरती गांधी यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संजय चौगुले तसेच लखनसिंग पटेल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण मान्यरारांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास शाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी व रोटरीचे सदस्य दीपक आहुजा, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, दर्शना गांधी, दिनेश अगरवाल, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, रेणुका पासपुले, योगिता बोधले, विठ्ठल सातपुते, आनंद पारेकर, बसाटे, दिनेश ताठे, सोमनाथ ठाकर, साहेबगौडा पाटील इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले.

Previous Post

सोलापूरात “सायकल लव्हर्स ” कडून प्रजासत्ताक दिनी 77 किमी सायकलिंग करून सलामी

Next Post

क्रेडाई सोलापूर तर्फे प्रॉपर्टी एक्स्पो २०२५-२६ चे आयोजन

Next Post
क्रेडाई सोलापूर तर्फे प्रॉपर्टी एक्स्पो २०२५-२६ चे आयोजन

क्रेडाई सोलापूर तर्फे प्रॉपर्टी एक्स्पो २०२५-२६ चे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In