सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बारावी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी बुधवारी ऑनलाईन पालक-शिक्षक सभा घेण्यात आली . या सभेमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. वर्ग शिक्षकांनी आणि विषय शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत पालकांशी चर्चा केली. या पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, नोट्स लिहिणे, युट्यूबचे व्हिडिओ न पाहने, नीट, जेईई परीक्षा अशा विषयांवर पालकांना माहिती देण्यात आली . या ऑनलाइन सभेसाठी सायन्सचे 116, कॉमर्सचे 88 तर आर्टसचे 32 पालक हजर होते. पालकांनी कनिष्ठ महाविद्यालय राबवित असलेल्या ऑनलाइन उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.